मुंबईतील फोर्ट येथे इमारत कोसळली
अग्निशामक दलाचे बचावकार्य सुरू
अग्निशामक दलाचे बचावकार्य सुरू
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतील फोर्ट येथील जीपीओ समोरील भानुशाली बिल्डिंगचा काही भाग कोसळला. सदर घटना दुपारी ४.३० वाजता घडली असून अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर इमारत ही पाच मजल्यांची होती.
अग्निशामक दलाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येत असून पोलिसांकडून सदर इमारत खाली करण्यात येत आहे. तर महापालिकेतर्फे मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने फोर्ट येथे भेट दिली. तसेच महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट देत इमारतीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

1 टिप्पण्या
बातमी वाचून आणि व्हिडीओ बघून अंगावर शहारे आले. काय परिस्थिती असेल तिथे.बापरे
उत्तर द्याहटवा