Ticker

6/recent/ticker-posts

नालासोपाऱ्यात रेल रोको

एसटी सेवा नाकारल्याने नोकरदारांचा उद्रेक

नालासोपारा, दादासाहेब येंधे : अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर नोकरदारांना बुधवारपासून एसटी बसमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे शेकडो प्रवाशांचा नालासोपारा रेल्वे स्थानकात सकाळी आठ वाजता च्या  सुमारास काल उद्रेक झाला. मुंबईहून विरारकडे जाणारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीची
लोकल अडवून आम्हालाही रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. या आंदोलनामुळे ही लोकल अडीच तास खोळंबली होती. प्रवाशांना रेल्वे रुळावरून हटवण्यासाठी रेल्वे पोलीसांना पाचारण करावे लागले. कोरोनामुळे चार महिने घरामध्ये थांबावे लागल्याने परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न पडलेल्या प्रवाशांचा संयम सुटला. इतर प्रवाशांना प्रवास करण्यास नकार दिल्यामुळे प्रथम एसटी डेपोमध्ये प्रवाशांनी जोरदार आंदोलन केले. त्यानंतर रेल्वेचे संरक्षण पत्रे तोडून शेकडो प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर प्रवेश करून आंदोलन केले.



नालासोपारा रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी 
जमलेले संतप्त प्रवासी.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या