Ticker

6/recent/ticker-posts

‘वाहन चोरणाऱ्या सराईत गुन्हेगांराना जेरबंद करण्यास वनराई पोलीस ठाणे यशस्वी’

‘वाहन चोरणाऱ्या सराईत गुन्हेगांराना जेरबंद करण्यास वनराई पोलीस ठाणे यशस्वी’
मुंबई, दादासाहेब येंधे: बृहन्मुंबई हद्दीत कोव्हीड १९ या आजाराने बेजार झालेल्या परिस्थीतीच्या काळात मो/वाहन चोरीचे गुन्हे जास्त प्रमाणात घडले होते. सदर गुन्हयांचे गांर्भीय लक्षात घेवून मा अप्पर पोलीस आयुक्त श्री. दिलीप सावंत, यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
सदरबाबत लॉकडाऊनच्या काळात पो.उ.आयुक्त परीमंडळ १३ मुंबई, मा. श्री. डॉ. स्वामी, यांनी वेळोवेळी परिमंडळातील गुन्हेप्रकटीकरण अधिकारी/अंमलदार यांच्या बैठका घेवून मो/वाहन चोरी संदर्भात गुन्हयांचा आढावा घेवून सदर गुन्हे तात्काळ उघडकीस आण्यासाठी वनराई पोलीस ठाण्याचे गुन्हेप्रकटीकरण अधिकारी/अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले होते. सदरबाबत मागील ३० दिवसांपासून विशेष मोहिमेअंतर्गत गुन्हेप्रकटीकरण पथकाने मो/वाहन चोरी करणा-या इसमांबाबत गोपीनीय माहिती काढुन, संशयीतांवर पाळत ठेवून खास खब-यांची मदत घेवून आरोपीतांचे शोध कार्य सुरू केले, पथकाने मेहनतीने कौशल्यपूर्व तपास करून वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली गुन्हेप्रकटीकरण पथकाने शिताफिने एकुण २ आरोपीतांना अटक करून त्यांच्याकडुन एकुण ३ ऑटोे रिक्षा, २ रॉयल इन्फिल्ड बुलेट, २ मो/सायकल असा एकुण ५, ८०,०००/- रूपयांची वाहने हस्तगत करण्यात आली असून सद्य परिस्थीतीत अटक आरोपी १) गणेश मणी देवेंद्र वय २५ वर्षे, २) विष्णु सुदामा सिंग वय २० वर्षे, हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
सदरची उत्कृष्ट कामगीरी उत्तरप्रादेशिक विभागाचे मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री.द िलीप सावंत, मा पो.उ.आयुक्त परीमंडळ १२ मुंबई, श्री डॉ स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त दिंडोशी विभाग, मुंबई. श्री. सुभाष जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गितेंद्र भावसार, पो.नि गुन्हे सौ. राणी पुरी, गुन्हेप्रकटीकरण अधिकारी स.पो.नि भरत घोणे, पो.उ.नि प्रशांत गांगुर्डे, पो.ह.२८१०४/महेश जाधव, पो.ह.३२१६३/प्रविण मोरे, पो.ना. ९६०५३२/खामकर, पो.शि.०८१७१७/दत्ता मोरे, पो.शि. ११०५६४/सुमित देवकाते, पो.शि.१८०८०/सागर पवार, पो.शि. ११०२२७/पालवे यांनी केली आहे.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या