शॉपिंग मॉल, जिम सुरू करणार
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतील कोरोना ग्रस्तांचा दर आटोक्यात येत असतानाच पुण्यात आता ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत राबवलेल्या 'मिशन झिरो' प्रकल्पामुळे मुंबईतील रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणेच ठाणे आणि पुण्यातही 'मिशन झिरो' प्रकल्प राबविणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्या या मागणीसाठी शेकडो संतप्त प्रवाशांनी नालासोपारा येथे जोरदार आंदोलन केले. या घटनेवर आरोग्ययमंत्री राजेश टोपे यांनी भााष्य केेले. लोकल सेवा सुरु करण्याची मागणी रास्त आहे; मात्र ट्रेनमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळले जाणार नाही. त्यामुळे ट्रेन सुरू करायच्या की नाही कोणत्या टप्प्यात
करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असे ते म्हणाले.
राज्यात आता पुन्हा लॉक डाऊन करण्यात येणार नाही. आता मिशन बीगिन अंतर्गत अनेक बाबी सुरू करण्यावर आमचा भर आहे आणि उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. दुकाने आणि कार्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. आता तेथील संख्या वाढविण्याचा प्रयत्नही आहे. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरू केल्या जातील.
त्याचप्रमाणे शॉपिंग मॉल्स, स्विमिंग पूल, जिम देखील सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे असे ते म्हणाले.
0 टिप्पण्या