माळशेज घाटात दरड कोसळून पोलीस उपनिरीक्षक जखमी
सरळगाव : कल्याण-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात सकाळी साडेअकरा वाजता दरड कोसळून पोलीस निरीक्षक अशोक देसले गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अशोक देसले आपल्या कारने माळशेज घाटातून जात असताना घाटातील बोगद्याजवळ त्यांच्या गाडीवर दरड कोसळली. भला मोठा दगड गाडीच्या बाजूला पडल्याने दुर्घटना थोडक्यात टळली आहे. रस्त्यावर पडलेला राडारोडा जेसीबीच्या साह्याने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात मुरबाड पोलिसांना यश आले आहे.




1 टिप्पण्या
माळशेज घाटात दरड पडण्याचं दुखणं दरवर्षीचंच आहे.
उत्तर द्याहटवा