Ticker

6/recent/ticker-posts

मांसाहार प्रेमींची चिकण, मटणासाठी गर्दी

मांसाहार प्रेमींची चिकण,  मटणासाठी गर्दी 

मुंबई, दादासाहेब येंधे : गटारी निमित्त आज खवय्यांची, मांसाहार प्रेमींची चिकण, मटणासाठी ठीकठिकाणी गर्दी दिसून येत आहे. आज मांस, मटण, चिकण, मासे खाण्यासाठी शेवटचा दिवस आहे. म्हणजेच मंगळवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने बरेचजण या महिन्यात मांसाहार करीत नाहीत. त्यामुळे कित्येक ठिकाणी खरेदीसाठी लांबच लांब रांगा दिसत आहेत. सोशल डिस्टंसिंग राखत व तोंडावर मास्क लावून नागरिक सकाळी पाच वाजल्यापासून रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मोठया प्रयत्नाने मटण, चिकण पदरात पडल्यानंतर काही जण तर दारूची सोय करण्यासाठी वाईन शॉपभोवती घिरट्या घालताना दिसत होते.

सोशल मीडियावर मोठा उत्साह
लॉक डाऊनमुळे बऱ्याच जणांची निराशा झाली होती. परंतु घरोघरी मांसाहारी पदार्थांचे बेत आखत नागरिकांनी आपली गटारी साजरी केली. सोशल मीडियावर कोंबडी वडे, चिकन करी, मासे आदी खाद्यपदार्थांचे फोटो, तसेच स्टेटस पाहायला मिळत होते.


मुंबईतील लालबाग येथील काही क्षणचित्रे










https://onlinereporter1.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या