इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या १० वर पोहोचली
मुंबई, दादासाहेब येंधे: फोर्ट येथील भानुशाली इमारतीच्या मालकाने इमारत दुरुस्ती साठी मुंबई महापालिकेकडून जून २०१९ मध्ये आयओडी घेतले होते. त्यानंतर ही मागील वर्षभरात इमारतीची दुरुस्ती का करण्यात आली नाही. याची चौकशी मुंबई महापालिकेतर्फे सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या दुर्घटनेतील मृतांची संख्या दहा झाली असून दोघांवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती अग्निशामक दलातर्फे शुक्रवारी देण्यात आली.
भानुशाली इमारतीच्या दुरुस्तीसाठी इमारत मालक व रहिवाशांचे मागील चार ते पाच वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहारही करण्यात आला होता. इमारत दुरुस्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र, आयओडी (इंटिमेशन ऑफ डिसअप्रोव्हल), नकाशे याची मागणी रहिवाशांनी केली होती. दोन जून २०१८ रोजी प्रदान करण्यात आली होती. तसेच इमारतीचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक परवाना १ जून २०१९ रोजी ही देण्यात आला होता. म्हणजे पालिकेच्या पातळीवर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, त्यानंतर दुरुस्ती का करण्यात आली नाही. याची चौकशी आता महापालिकेनेकडून केली जाईल या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत तो दहावर गेला असून दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेत मृतांमध्ये गुप्ता कुटुंबातील तिघे, कुटुंबातील दोन आणि चौरसिया या कुटुंबातील दोघांचा समावेश आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एकूण २७ जण अडकले होते. त्यातील दोघांना स्थानिक रहिवाशांनी तर उर्वरित नागरिकांना अग्निशामक दलाने सुखरूप बाहेर काढले आहे.
1 टिप्पण्या
महापालिकेने जीर्ण झालेल्या इमारती खाली करायला हव्यात.
उत्तर द्याहटवा