गंभीर गुन्ह्यातील आरोपी फरार
पुणे, दादासाहेब येंधे : येरवडा तात्पुरत्या कारागृहातून मोक्यासह गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपी गुरुवारी पहाटे खिडकीचे गज तोडून पळून गेल्याची गंभीर घटना गुरुवारी पहाटे घडली. येरवडा तात्पुरत्या कारागृहातून आरोपी पळून जाण्याची ही चौथी घटना आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीन बंदी तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात येत आहेत. वारंवार बंदी पळून जाण्याच्या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
आज रोजी १६-७-२०२० पहाटे च्या सुमारास तात्पुरते कारागृह, येरवडा या ठिकाणी येथील पहिला मजला, इमारत क्रमांक ४ येथून खोली क्रमांक ५ मधील खिड़कीचे गज उचकटून तोडून टाकून एकूण ५ आरोपी पळून गेले आहेत.
१) देवगण अजिनाथ चव्हाण,
रा. बोरावके नगर, तालुका दौंड,
जिल्हा पुणे.
दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं.१४९/२०२०
भा.द.वी.क. ३९५,३९६,३९७ (मोका अंतर्गत)
२) गणेश अजिनाथ चव्हाण,
रा. बोरावके नगर, तालुका दौंड,जिल्हा पुणे.
दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं.१४९/२०२०
भा.द.वी.क. ३९५,३९६,३९७ (मोका अंर्तगत)
३) अक्षय कोंडक्या चव्हाण,
रा. लिंगाळी माळवाडी तालुका दौंड,
जिल्हा पुणे.
दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं.१४९/२०२०
भा.द.वी.क. ३९५,३९६,३९७ (मोका अंतर्गत)
४) अंजिक्य उत्तम कांबळे,
रा.सहकारनगर, टीळेकरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. २१९/२०२०
भा.द.वी.क. ३४४(अ),३८६,५०६,३४.
५) सनी टायरन पिंटो,
रा. काळेवाडी पेट्रोल पंप बाजूस, स्मशान भूमी समोर,पुणे.
वाकड पोलीस स्टेशन गु.र.नं. ५२४/२०२०
भा.द.वी.क.३७९.
तरी सदर आरोपींचा आप-आपल्या पोलीस ठाण्याचे हद्दीत शोध घेऊन मिळून आल्यास त्यांना ताब्यात घेऊन येरवडा पोलीस ठाण्यास अवगत करावे. असे येरवडा पोलीस ठाणे, पुणे चे सहा. पोलीस निरीक्षक श्री. बलभीम ननवरे यांनी कळवले आहे.





0 टिप्पण्या