गणेशमूर्तींची उंची चार फुटांपर्यंत ठेवा
मुख्यमंत्र्यांची गणेशोत्सव मंडळांना सूचना
मुंबई, दादासाहेब येंधे: उंच उंच मुर्त्या आणि भव्यदिव्य रोषणाई ही मुंबईतील गणेशोत्सवाची खास अशी ओळख आहे. पण, कोरोना या महामारीमुळे यंदाचा उत्सव साधेपणाने व सुरक्षितरित्या पार पडावा म्हणून गणेश मूर्तीच्या मूर्तीबाबातचा विषय पुढे आला होता. त्यावर सार्वजनिक मंडळांशी चर्चा करून चार फुटांपर्यंतच्याच मूर्ती मंडपात प्रतिष्ठा व्हाव्यात असा पर्याय पुढे आला; आणि सर्वांनी तो मान्य केला. मोठ्या मूर्ती आणताना आगमनाच्या वेळी तसेच विसर्जनाच्या वेळी जास्त प्रमाणात कार्यकर्ते असावे लागतात. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे टाळणे गरजेचे आहे. शेवटी मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गणेशमंडप देखील साधेच असावेत असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे.
3 टिप्पण्या
बरोबर आहे, उंची कमीच ठेवायला हवी. म्हणजे आगमनावेळी आणि विसर्जनावेळी सोशल डिस्टनशिंगचा पालन होईल व आपण कोरोना सारख्या महामारीला रोखू शकू.
उत्तर द्याहटवामुख्यमंत्र्यांची उत्कृष्ट सूचना.
उत्तर द्याहटवामुर्ती लहानच हवी. विसर्जनावेळी विटंबना होते.या कोरोनाच्या काळात तर बरेच लोक एकत्र येण्यापासून आपण रोखू शकतो.
उत्तर द्याहटवा