Ticker

6/recent/ticker-posts

कोयना वसाहतीतील झोपडीधारक भयभीत

कोयना वसाहतीतील झोपडीधारक भयभीत
48 तासात झोपडीधारकांना स्थलांतरीत होण्याचे आदेश
मुंबई: गोरेगाव पूर्व येथील कोयना वसाहतीतील डोंगराच्या पायथ्याशी राहणारे झोपडीधारक खूपच भयभीत झाले आहेत. राजीव गांधी नगर आणि भिम नगर येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेली संरक्षक भिंत बांधण्याचे काम महापालिकेतर्फे करण्यात येणार असून या वसाहतीत राहणार्‍या काही झोपडीधारकांना 48 तासाच्या आत मुळ जागेवरून माहूल गाव, चेंबुर येथे स्थलांतरीत होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
येथील स्थानिक रहिवाशांकडून मिळालेली माहिती अशी की, गोरेगाव पूर्व येथील डोंगराच्या पायथ्याशी कोयना वसाहत आहे. येथील रहिवाशी मागील 30 वर्षांहून अधिक काळापासून येथे आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत. मात्र डोंगर पायथ्याशी असलेल्या संरक्षक भिंतीचे काम महापालिकेतर्फे हाती घेण्या आले असून त्यामुळे कोयना वसाहतीतील बर्या च झोपड्या बाधित होणार आहेत. यापूर्वी बाधित रहिवाशांना मालाड पूर्व येथील आप्पा पाडा येथे स्थलांतरीत करण्याचे पालिकेतर्फे ठरविण्यात आले होते. मात्र असे असताना अचानक पालिकेद्वारे नोटीस बजावण्यात आली असून त्यांना 48 तासाच्या आत माहूल गाव, चेंबुर येथे स्थलांतरीत होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
येथील स्थानिक रहिवाशंांनी सांगितल्यानुसार, या संपूर्ण परिसरात घरकाम करणार्याथ महिला आणि नोकरदार वर्ग आपल्या मुलाबाळांसोबत राहण्यास आहेत. त्यांच्या उत्पन्नाचे साधन याच परिसरात असून अचानक त्यांना चेंबुर येथे स्थलांतरीत होण्याचे आदेश दिल्याने ते रडकुंडीला आले आहेत. कोराना सारख्या महामारीमुळे मागील तीन महिन्यांपासून आर्थिक दृष्ट्या बेजार झालेल्या या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असताना, अचानक स्थलांतरीत होण्याच्या आदेशाची कुऱ्हाड कोसळली असून प्रशासनाने या गरीब झोपडीधारकांना वाऱ्यावर सोडले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या