Ticker

6/recent/ticker-posts

रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य निर्णय

रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य निर्णय

मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे तीन फुटांची मूर्ती बनविण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी या मंडळाची १८ फुटांची मूर्ती असते. लाडक्या लंबोदराची लहान मूर्ती तसेच गणेशोत्सवही यावर्षी अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे असे मंडळाचे अध्यक्ष श्री भाई मयेकर यांनी कळवले आहे. 
कोरोना-या महामारीने देशातच नव्हे तर जगातही उच्छाद मांडला असून त्याला आटोक्यात आणण्यासाठी व सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सुरळीत व सुस्थितीत आणण्यासाठी बराच वेळ द्यावा लागणार आहे. सरकारी सूचनांचे तंतोतंत व काटेकोर पालन करण्यासाठी गर्दी टाळून संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने २०२० या साली सार्वजनिक गणेशोत्सव चार फुटांपेक्षा कमी उंचीची गणेशमूर्ती साकारून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे रंगारी बदक चाळ रहिवासी संघ गणेशोत्सव मंडळाने ठरवून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.



https://onlinereporter1.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. गणेश मूर्ती लहानच असावी. म्हणजे आगमन आणि विसजर्न करताना गर्दी होनार नाही. व आपण कोरोनाला हरवू शकु. सदर मंडळाचा स्तुत्य निर्णय आहे.

    उत्तर द्याहटवा