मुंबई : मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री गदक एक्सप्रेस त्याच मार्गावरून जाणाऱ्या चालुक्य एक्सप्रेसला धडकली. गदक एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने सिग्नल चुकवल्याने हा अपघात घडला. या अपघातात कोणीही प्रवासी जखमी झाले नाही. मात्र, मध्यरात्रीपर्यंत मध्य रेल्वेवरील लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांची सेवा पूर्णपणे कोलमडली होती.
भारतीय रेल्वे शनिवारी १७० व्या वर्षात पदार्पण करत असतानाच त्याच्या पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडली.
Photo:viral






0 टिप्पण्या