पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
पोलिसांकडून १०५ चोरीचे मोबाईल हस्तगत
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना महामारीच्या काळापासून मोबाईल हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. कारण, प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन झाली आहे. बँकेचे व्यवहार, इतर कामकाज, ऑनलाईन शाळा इत्यादींमुळे मोबाईलचे महत्त्व वाढले आहे. परिणामी, सगळ्यांच्या हातात चांगले महागडे मोबाईल दिसून येत आहेत. आणि याचमुळे मोबाईलच्या चोरींचे प्रमाण देखील वाढत चालले आहे.
तक्रारदाराचा मोबाईल हरवल्यास मिसिंग प्रमाणपत्र देण्यात येते. परंतु, मोबाईल ठाण्याचे कामकाजाची व्याप्ती व ताणतणाव पाहता तसेच बंदोबस्त आणि इतर कामकाज पाहता गहाळ मोबाईल परत मिळण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. मोबाईल गहाळ झाल्यास मोबाईल धारकास अत्यंत वाईट वाटते. गरीब व मध्यमवर्गीय यांसाठी तर हे आर्थिक नुकसानदायी ठरते. परंतु गहाळ मोबाईल नागरिकांना परत मिळण्यास मदत झाली तर सर्वसाधारण जनतेच्या मनात पोलिसांची प्रतिमा उंचावण्यास नक्कीच मदत होईल. तसेच जनमाणसांत पोलिसांबद्दल आदर व विश्वास देखील वाढेल.
त्या अनुषंगाने वरळीच्या मध्य विभाग सायबर पोलिस ठाण्यामार्फत मध्य प्रादेशिक विभागाअंतर्गत गहाळ किंवा चोरी झालेल्या मोबाईलची माहिती गोळा करण्यात आली होती. दिनांक १५/०२/२०२२ ते १४/०४/२०२२ पर्यंत हरवलेल्या मोबाईलबाबत उपलब्ध तांत्रिक माहितीच्या कौशल्यपूर्वक अभ्यास करून कमी कालावधीत अथक परिश्रम करून सध्या गहाळ मोबाईल वापरत असणाऱ्या व्यक्ती व त्यांचे मित्र, नातेवाईक, सहकारी यांना संपर्क साधून गहाळ, चोरी झालेले १०५ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. हे कार्य मोबाईल मिसिंग पथकाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे दैनंदिन कामकाज सांभाळून केवळ दीड महिन्यातच पूर्ण केले आहे. त्यामुळे बृहन्मुंबई पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात सुधारण्यास मोलाचे योगदान मध्य विभाग सायबर पोलिस ठाणे मार्फत झाले आहे.
हरवलेले, चोरी झालेले एकूण अंदाजे १५,५०,०००/- किमतीचे १०५ हस्तगत मोबाईलच्या मूळ मोबाईल धारकांचा शोध व संपर्क साधून ते मोबाईल त्यांना परत देण्याची तजवीज सध्या करण्यात येत आहे.
यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संजय पांडे, सहपोलीस आयुक्त, गुन्हे मिलिंद भारंबे, अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे विशेष वीरेश प्रभू, सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाणे वरळी, मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर महादेव शिंदे यांच्या देखरेखेखाली पोलीस उपनिरीक्षक सुयोग अमृतकर, पोलीस नाईक नंदकिशोर महाजन, पोलीस शिपाई जय गदगे, महिला पोलीस शिपाई शीतल सावंत, महिला पोलीस नाईक सुप्रिया राऊत यांनी पार पाडली.
Press note

0 टिप्पण्या