Ticker

6/recent/ticker-posts

वागशीर पाणबुडी अधिक स्वदेशी

मुंबई : फ्रान्सच्या स्कॉर्पियन पाणबुड्यांच्या तंत्रज्ञानावर आधारित 'कलवरी' श्रेणीतील अखेरच्या पाणबुडीची बांधणी अंतिम टप्प्यात आहे. नौदलाकडून 'वागशीर' असे नामांतर होणारी ही पाणबुडी आधीच्या सर्व पाणबुड्यांमध्ये आज सर्वाधिक स्वदेशी आहे. पाणबुडीतील वातानुकूलित यंत्रणा व संवाद प्रणाली, हे पहिल्यांदाच पूर्णपणे भारतीय आहे.





'कलवरी' श्रेणीतील ४ पाणबुड्या सध्या नौदलाच्या ताफ्यात सेवा देत आहेत. तर पाचव्या पाणबुडीची समुद्री चाचणी अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर 'वाघशीर' ही अखेरची पाणबुडी असून २० एप्रिलला या पाणबुडीचे जलावतरण होणार आहे. यामध्ये जवळपास ४० टक्के सुटे भाग परदेशी कंपन्यांनी भारतात तयार केले आहेत. तर ४० टक्के सुटे भाग भारतीय कंपन्यांनी तयार केलेले आहेत. त्यामध्ये अत्यंत महत्वाच्या वातानुकूलित यंत्रणा व संवाद प्रणाली चा समावेश आहे. या आधी या सर्व प्रणाली फ्रेंच बनावटीच्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या