लॉक डाऊनच्या भीतीने प्रवाशांची रेल्वे स्थानकांबाहेर गर्दी
मुंबई : मुंबईत पुन्हा मोठया प्रमाणात कोविडचा संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाऊनची शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमावर जनतेशी संवाद साधताना कठोर निर्बंध लावण्याची शक्यता वर्तविली होती. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच परप्रांतीय नागरिकांनी लॉकडाऊनच्या भीतीने आपल्या गावची वाट धरली आहे. परिणामी, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे, दादर आदी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांत गर्दी झालेली दिसून येत होती.
पुन्हा लॉकडाऊन होईल या भीतीने अनेकांनी काही दिवसांपूर्वीच रेल्वेचे आरक्षण केले होते. त्यांनी काल सकाळपासूनच आपल्या कुटुंबियांसह रेल्वे स्थानक गाठले. त्यामुळे सकाळपासूनच सीएसएमटी, दादर, वांद्रे, लोकमान्य टर्मिनस, पनवेल स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती.
0 टिप्पण्या