महापालिकेची नागरिकांना साद; नियमावली जारी
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयात, कामाच्या ठिकाणी वावरताना कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासोबतच आता घरात वावरतानाही नियम पाळणे गरजेचे आहे. घरात बोलताना शक्यतो एकमेकांच्या चेहऱ्याकडे थेट बघू नका. वातानुकूलित यंत्रणा आणि बंदिस्त जागेत जाणे टाळा, असा सल्ला महापालिकेने नागरिकांना दिला आहे.बाहेरून घरात आल्यावर काय करावे, घरी वावरताना काय करावे याबाबत महापालिकेने नियमावली तयार केली आहे. कोविड नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नागरिकांनीही स्वतःहुन काही गोष्टी अंगिकारणे गरजेचे असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.
कौटुंबिक स्तरावर :
प्रत्येकवेळी बाहेरून, कार्यालयातून घरी परतल्यावर आंघोळ करावी. कपडे धुण्यासाठी थेट एका बदलीमध्ये टाकावीत.
बाहेरून आलेल्या व्यक्तींनी घरात प्रवेश केल्यानंतर थेट स्नान गृहात जावे. यावेळी ती व्यक्ती ज्या ठिकाणावरून चालत गेली ती जागा प्रथम साबणाच्या पाण्याने पुसावी. त्यानंतर केवळ पाण्याने भिजवलेल्या फडक्याने फरशी पुसावी.

0 टिप्पण्या