कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाणार आहे. त्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याबाबतची घोषणा केली.
सध्या कोरोनाची स्थिती पाहता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यात विद्यार्थ्याने कशा प्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे. पण, आताची परिस्थिती बघता यावर्षी हे शक्य होऊ शकणार नाही. राज्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

0 टिप्पण्या