Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनचा इशारा

दोन दिवसांत होणार निर्णय 

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रसार झपाट्याने  वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येत ही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, तरीदेखील रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागतो की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर काल राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला ऑनलाइन संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यातील चाचण्यांची संख्या वाढून दररोज अडीच लाख चाचण्या सुरू केले जाणार असल्याचे सांगितले.

परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला लॉकडाऊन संपूर्णतः लागू करावा लागतो की काय, अशी शक्यता होती, ती परिस्थिती आजही कायम आहे. मधल्या काळात आपण शिथिल झालो, लग्नसमारंभ, पार्ट्या  सुरु होते. राजकीय मोर्चे, आंदोलन सुरू झाले. कोरोना गेला अशा रीतीने सगळं सुरू होतं. दुर्देवाने जी भीती सगळे तज्ञ व्यक्त करीत होते ती खरी ठरली. मार्चमध्ये गेल्या वेळेपेक्षाही अक्राळ विक्राळ रूप धारण करून  हा विषाणू आपली परीक्षा बघतोय. आपल्याला सगळ्यांना एकत्र लढण्याची गरज आहे. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काही काळात निर्बंध काही दिवसात लावले जातील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील. कार्यालयांना या आधीच सूचना दिल्या आहेत. काही नियम आधीच लागू केले आहेत. सगळ्या ट्रेन तुडुंब भरून चालत आहेत. रोजगार परत मिळतील पण जीव परत मिळणार नाहीत. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या